सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल

आमच्याविषयी

परिचय

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल

     ही संस्था २०१० साली स्थापन करण्यात आली असून, दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे — समाजातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शिक्षण, आरोग्य, रोजगार, पुनर्वसन आणि सामाजिक सन्मानाचे अधिकार मिळवून देणे.

     संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम जसे कि, आरोग्यसेवा, समाजसेवा, व्यावसायिक प्रशिक्षण, दिव्यांग पुनर्वसन, महिला सक्षमीकरण, तसेच युवक विकास इत्यादी कार्यक्रम राबवले जातात. आजवर ४५००+ दिव्यांगांना उपकरण वितरण, २५००+ वैद्यकीय सहाय्य, आणि ३०+ दिव्यांग उद्योजक घडविण्याचे उल्लेखनीय कार्य संस्थेने केले आहे.

     संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे हे एक तपाहून अधिक वर्ष या क्षेत्रात कार्यरत असून, ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित असून विविध शासन समित्यांमधून दिव्यांगांसाठी व समाजासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था “सक्षम दिव्यांग, सक्षम समाज” या ध्येयाने कार्यरत आहे. संस्थेच्या सर्व उपक्रमांमधून दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आणि सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक वातावरण तयार करणे हेच संस्थेचे मिशन आहे.

आमच्या प्रवासाची 16 वर्षे

संस्था अध्यक्ष

       श्री. अनिल शिंगाडे, संस्थापक आणि अध्यक्ष – सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल हे गेली अनेक वर्षे दिव्यांगांच्या हक्कांसाठी अथक परिश्रम घेणारे, समाजसेवेत कार्यरत असलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आहे.

       २०१० साली संस्थेची स्थापना करून त्यांनी “सक्षम समाज, सक्षम देश” हे ध्येय ठरवले आणि त्यासाठी अविरत कार्य सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने आजवर हजारो दिव्यांगांना शिक्षण, रोजगार, आरोग्य सहाय्य, व पुनर्वसन या क्षेत्रात मदत केली आहे.

       श्री. शिंगाडे यांनी २२०+ आंदोलने, २९+ उपोषणे आणि १५+ मोर्चे यामधून दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रखर भूमिका घेतली. जिल्हा दिव्यांग समिती, पालकमंत्री समिती तसेच सिंधुदुर्ग दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक म्हणून ते सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या पुढाकाराने अनेक युवकांना कौशल्य प्रशिक्षण मिळाले, महिलांना बचत गटांद्वारे सक्षमीकरण मिळाले, आणि “Divyang Bharari” या सामाजिक माध्यम प्लॅटफॉर्मद्वारे दिव्यांग जनजागृतीचा आवाज सर्वदूर पोहोचला.

     त्यांची दृष्टी स्पष्ट आहे —
 “प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला आत्मनिर्भर, सन्माननीय आणि समाजातील समान स्थान मिळावे.

???????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

स्थापना व नोंदणी

२०१० मध्ये कसाल येथे संस्थेची स्थापना झाली. संस्था सोसायटी नोंदणी कायदा १८६० आणि PWD कायदा १९९५ अंतर्गत नोंदणीकृत आहे.

कागदपत्रे

saikrupa registration

हात मदतीचा

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल

॥ जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ॥ उणे जें जें ज्यांस तें तयास लाभो॥

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल

About Us

Refund Policy

Privacy Policy

Terms & Conditions

Follow Us

© 2025 Sindhudurg Saikrupa Apangshakti Bahu-Uddeshiy Shikshan Sanstha, Kasal.
Developed & maintained by “CRESTA VISION STUDIOS”

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल

Follow Us

© 2025 Sindhudurg Saikrupa Apangshakti Bahu-Uddeshiy Shikshan Sanstha, Kasal.
Developed & maintained by “CRESTA VISION STUDIOS”

Call Us Now
WhatsApp
Scroll to Top